राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये 2020 ते 2022 या कालावधीमध्ये शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, तसेच इतर मालमत्तेचा सुद्धा त्यामध्ये समावेश होता, त्यावेळेस वेळोवेळी निधी वितरित करण्यात आलेला होता. परंतु इतर कारणांनी अथवा कोरोनामुळे काही निधि मागणीच्या प्रस्तावावर कार्यवाही झालेली नव्हती.
नैसर्गिक आपत्तीने शेती पिकाचे व इतर मालमत्तेचे नुकसान झालेले असताना यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी म्हणजेच बाधितांना नुकसान भरपाई देण्यासाठी 106 कोटी 64 लाख 94 हजार एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. व त्या संबंधीचा GR सुध्धा निर्गमित करण्यात आलेला आहे.
अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी बाधित शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींकडून मागणी केली जात होती व त्यांच्या मागणीला यश आलेले आहे, मदत मागणीच्या प्रस्तावातील अडथळे दूर करून निधी वाटपास मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.
यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे,शासन निर्णय बघण्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली आहे, संबंधित जीआर मध्ये नुकसानीचा कालावधी तसेच पात्र ठरलेले त्यातील जिल्हे, विभागीय आयुक्त यासंबंधीची संपूर्ण माहिती देण्यात आलेली असून त्यामध्ये बाधित क्षेत्राचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे संपूर्ण माहिती संबंधित जीआर मध्ये शेतकऱ्यांना प्राप्त होईल.