Onion Subsidy: कांदा अनुदान नवीन जीआर आला, आता या शेतकऱ्यांना मिळणार संपूर्ण कांदा अनुदान, विस्तृत माहिती पहा

शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली होती त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांद्याला कवडीमोल दरामध्ये विकावे लागले होते. त्यानंतर शेतकऱ्यांकडून शासन दरबारी मदत मागण्यात येत होती तसेच अनुदान देण्याची मागणी करण्यात येत होती. त्याच अनुषंगाने शासनाने कांदा अनुदान देण्याचे ठरवले होते.

 

ज्या शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये विक्री केला होता अशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने त्यावेळेस केली होती. त्यानुसार काही शेतकऱ्यांना काही अनुदान वाटप देखील केलेले आहे. परंतु अजूनही अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही त्यामुळे हे अनुदान वाटप करण्यासाठी शासनाने दोन अकरा कोटी रुपये रक्कम वाटप करण्यासाठी मान्यता दिलेली आहे.

 

चौथ्या टप्प्यातील कांदा अनुदान:

शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित होते त्यामुळे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी नवीन अनुदान वाटपासाठी 211 कोटी रुपये रक्कम वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

 

कांदा अनुदान योजना 2024:

राज्य सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या कांदा अनुदान योजनेचा शेतकरी बांधवांना प्रतिक्विंटल 350 रुपये प्रमाणे 200 क्विंटल कांदा विक्रीसाठी अनुदान देण्याचे ठरवले होते. त्याच अनुषंगाने राज्य शासनाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील अनुदानापोटी दहा दहा हजार रुपयांची वितरण केलेले आहे. प्रत्येकी चार हजार रुपयाची रक्कम वाटप करण्यात आलेली होती. आतापर्यंत शेतकऱ्यांना 24 हजार रुपये अनुदान मिळालेले आहे.

आता चौथ्या टप्प्यानुसार उर्वरित अनुदान शेतकऱ्यांना मिळेल.

 

यांना मिळेल अनुदान:

शेतकरी बांधवांनो शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र होते आणि त्यांनी अर्ज केला होता आणि त्यांना काही टप्प्यातील अनुदान मिळालेले आहे परंतु उर्वरित अनुदान मिळणे बाकी आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना उर्वरित अनुदान ची रक्कम मिळणार आहे.

अधिक माहितीकरिता video:

 

या प्रकारे आपण कांदा अनुदान योजने संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची बातमी जाणून घेतलेली. ही माहिती तुमच्या सर्व ओळखीच्या मित्रांना नक्की शेअर करा.