महत्वाचा निर्णय, आता यांना मिळणार मोफत वाळू, बांधकामासाठी अशी मिळवा मोफत वाळू | Online Mofat Valu

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत यापूर्वी कमी किमतीमध्ये सर्वसामान्यांना वाळू पुरवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता, महाराष्ट्र शासनाने नवीन वाळू धोरण अस्तित्वात आणले होते त्यानुसार अवैधरीत्या वाळूची वाहतूक तसेच उत्खनन बंद करण्यात आलेले असून आता शासन आपल्याला वाळू करणार आहे. तसेच काल महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वाळू धोरणामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले असून आता काही लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार आहे, तर ती कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार या संदर्भात देखील माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत 14 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये नवीन वाळू धोरणामध्ये काही अत्यावश्यक बदल करण्यात आलेले आहे. त्यानुसार आता वाळूचे दर देखील निश्चित करण्यात आलेले आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना मोफत व किती मोफत वाळू मिळेल या संदर्भात देखील माहिती देण्यात आलेली आहे.

 

ना नफा ना तोटा तत्वावर वाळू वाटप होणार:

 

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत बाळू धोरणामध्ये करण्यात आलेल्या बदलानुसार आता अतिशय कमी किमतीमध्ये वाळू मिळणार असल्यामुळे शासनाचा कोणताही उद्देश नफा कमवले नाही. सामान्यांना अत्यल्प दरात वाळू पुरवणे हा आहे.

 

1. वाळूचे उत्खनन तसेच वाळू डेपोपर्यंत नेण्यासाठी वाहतूक व व्यवस्थापन यासाठी निविदा काढण्यात येणार आहे.

2. मुंबई महानगर प्रदेशासाठी 1200 रुपये प्रति ब्रास इतकी वाळूचा दर असणार आहे.

3. इतर क्षेत्राकरिता 600 रुपये प्रति ब्रास इतका वाळूचा दर असणार आहे.

 

मोफत वाळू कुणाला मिळणार ?

 

मित्रांनो शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू वितरण होणार आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायची झाल्यानंतर तुम्ही घरकुल योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला मोफत वाळू मिळणार आहे.

 

मोफत वाळू किती मिळणार?

 

मित्रांनो शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास म्हणजेच 22.50 मीटर इतकी वाळू मोफत मिळणार आहे.

 

वाळू बुकिंग करिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

 

मित्रांनो शासनाच्या मार्फत मोफत वाळू तसेच कमी किमतीमध्ये वाळू मिळवण्यासाठी तुम्हाला महा खनिज महाराष्ट्र विभागाच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. येणाऱ्या पुढील पोस्टमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात माहिती जाणून घेऊया.

https://mahakhanij.maharashtra.gov.in/sandbooking/home

वरील वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

महिलांसाठी भन्नाट योजना! या महिलांना मिळणार पीठ गिरणी व शिलाई मशीन, या ठिकाणी कर्ज करा