हवामान विभागांतर्गत नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे, त्यानुसार राज्यांतील विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, विदर्भ तसेच मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सतर्क होऊन शेती पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये मेघा गर्जने सह पाऊस पडणार असून ढगाळ वातावरण राहणार आहे.
या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
राज्यातील धुळे, अहमदनगर, सांगली, सातारा, नाशिक, पुणे, सोलापूर, तसेच जळगाव या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, मुंबई, ठाणे, रायगड मध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अशाप्रकारे राज्यातच नाहीतर इतर राज्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी वेळेवर सतर्क होणे गरजेचे आहे कारण रब्बी हंगामातील शेतीची पिके काढणीवर आलेली असल्याने काढणीवर आलेल्या शेती पिकांना मोठ्या प्रमाणात पावसाचा व गारपिटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधानीने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिकांची काढणी करून घ्यावी.
100 टक्के अनुदानावर मिळणार शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन, या ठिकाणी अर्ज करा