राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना आता पीक कर्जमाफी देण्यात येणार आहे व यासंबंधीचा संबंधित जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जुलै ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे शेती पिकाची अतोनात नुकसान झाल्याने शासना अंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज माफी देण्यात येत होती. तसेच आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निधीचे वितरण कर्ज माफी अंतर्गत करण्यात आलेले आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये पीक कर्ज माफीसाठी निधीची मागणी, पुरवणी मागणी द्वारे करण्यात आलेली होती, प्रशासनाच्या वतीने पुरवणी मागणी अंतर्गत कर्जमाफी करिता 269.99 लाख निधीच्या 70 टक्के म्हणजे 265.99 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
शासणा अंतर्गत पुरवणी मागणीला मंजुरी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येईल, नैसर्गिक संकट दुष्काळ पूर परिस्थिती अशा प्रकारच्या विविध कारणांमुळे, शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी मिळाल्यास एक प्रकारची मदत होईल.
राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, 3 हजार 936 कोटी रुपयांचा निधी मंजूर