या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा चा दुसरा टप्पा, एवढ्या कोटींचा निधी मंजूर, तुम्हाला मिळणार का? | Pik Vima

खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडलेला होता अशा स्थितीमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित होते परंतु राज्यातील बीड जिल्ह्यामध्ये अग्रीम न मिळालेल्या शेतकऱ्यांना दुसरा टप्पा मंजूर करण्यात आलेला आहे.

 

खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अग्रीम पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले होते, परंतु उर्वरित पिक विमा मात्र अंतिम पीक कापणी अहवाला नंतर देण्यात येणार आहे. अशाप्रकारे ची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.

 

बीड जिल्ह्यातील 1 लाख 11 हजार 601 शेतकऱ्यांना अग्रीमचा 76 कोटी 27 लाख रूपये एवढा दुसरा टप्पा मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभार्थी वितरण केले जाणार आहे व वितरणात सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीमच्या दुसऱ्या टप्प्याचा लाभ दिला जात आहे.

90 टक्के अनुदानावर मिळणार मिनी ट्रॅक्टर सह सहाय्यक उपकरणे, आत्ताच अर्ज करा