प्रधानमंत्री पिक विमा योजना संपूर्ण देशामध्ये राबवीण्यात येते, या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेत असतात विमा भरपाई खरिप हंगाम 2023 करिता मंजूर करण्यात आलेली होती, त्यात 2330 कोटी रुपयांची विमा भरपाई होती व 52.73 लाख शेतकरी या करता पात्र होते.
या एकूण रकमेपैकी काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात आलेली आहे परंतु अद्याप सुद्धा 2.5 लाख शेतकरी लाभापासून वंचित आहे. कारण काही शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यासोबत आधार संलग्न केलेले नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झालेले नाही.
49.58 शेतकऱ्यांच्या खात्यावर 2243 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे परंतु, 2.5 लाख शेतकरी वंचित राहण्या मागचे कारण म्हणजे त्यांचे आधार कार्ड बँक खात्याला संलग्न नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांना विमा भरपाई न मिळण्यामागचे मुख्य कारण म्हणजे विमा भरपाई ही 1000 पेक्षा कमी असल्याने देता येत नाही.
शेतकऱ्यांना विमा भरपाई तर द्यायची परंतु त्यातून मार्ग कशा पद्धतीने काढायचा त्यामध्ये जर शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम ही एक हजारापेक्षा कमी असेल तर ती एक हजार रुपये एवढी देण्यात येईल परंतु एक हजारापेक्षा जास्त असलेली रक्कम विमा भरपाई म्हणून असल्यास तेवढी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल.