शेतकरी मित्रांना महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा काढताना सोयीस्कर व्हावं, तसेच अतिशय कमी पैशात किंवा मोफत शेतकऱ्यांना पीक विमा काढता यावा यासाठी शेतकऱ्यांना भरावयाची रक्कम कमी करून एक रुपया केलेली आहे. म्हणजेच राज्यामध्ये एक रुपयात पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यांमध्ये अनेक ठिकाणी बोगस पिक विमा प्रकरणी आढळण्यात येत आहे कारण की जवळपास निशुल्क शेतकऱ्यांना हा विमा काढता येत आहे त्यामुळे करून अनेक ठिकाणी frod pik vima काढून पैसे उखळण्याचा प्रकार उघडकीस येत आहे.
राज्यामध्ये पुन्हा एकदा बोगस पिक विमा आढळून आलेला असून बोगस पीक विम्याची प्रस्ताव दाखल करण्याचे निदर्शनास आल्यामुळे राज्यातील 11 csc केंद्र चालकांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहे. कृषी विभाग आणि पिक विमा कंपनी यांनी संयुक्त केलेल्या कारवाईतून हा प्रकार उघडकीस आलेला आहे.
या चौकशीमध्ये जवळपास 8916 बनावट pik vima प्रस्ताव आढळून आले आहेत. जवळपास 48000 हेक्टर पेक्षा जास्त जमीन विमा संरक्षित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या बनावट पीक विमा प्रस्तावामुळे शासनाला जवळपास 38 कोटी 56 लाख रुपये इतका विमा हप्ता भरावा लागला असता.
बनावट पिक विमा म्हणजे काय?
1. शेतजमीन नसतानाही पिक विमा काढणे.
2. शेतकऱ्यांची परवानगी न घेता त्या शेतकऱ्याच्या नावाने त्याला माहीत न होऊ देता, बनावट प्रस्ताव दाखल करून पीक विमा काढणे.
3. सातबारावर नोंद असलेल्या जमिनीपेक्षा जास्त जमीन क्षेत्रफळ दाखवून त्या जमिनीचा पिक विमा काढणे.
4. सरकारी मालकीच्या जमिनीवर जसे की महानगरपालिका तसेच नगरपालिका किंवा औद्योगिक क्षेत्रातील बिगर शेत जमिनीचा पिक विमा उतरवणे.
वरील सर्व बाबी या बनावट पीक विमा मध्ये समाविष्ट आहेत.
Pik vima Yojana 2024 चा उद्देश हा शेतकऱ्यांना हंगामामध्ये नुकसानी पासून बचाव करण्यासाठी तसेच आर्थिक आधार पुरवण्यासाठी आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत टाळण्यासाठी कृषी विभाग आणि पीक विमा कंपनी यांना सतर्क राहणे आवश्यक आहे.
महत्वाची बातमी नक्की वाचा: महा dbt शेतकरी योजनांची नवीन सोडत यादी जारी, संपूर्ण यादी पहा