राज्यातील यावर्षीची परिस्थिती बघितली असता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे तर काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सुद्धा जाहीर करण्यात आलेला असून, अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 चा पिक विमा काढलेला होता. परंतु शेतकऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी म्हणजे पिक विमा भरलेल्या 18 हजार 540 शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे.
अपात्र ठरविण्यात आलेले शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील आहे, ज्या शेतकऱ्यांनी संमती पत्र जोडलेले नव्हते अशांना अपात्र केलेले आहे, तसेही शेतकरी अपात्र ठरलेले आहे अशा शेतकऱ्यांच्या याद्या गाव निहाय पाठवण्यात येत आहे.
सोयगाव तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आलेली असून,54 हजार शेतकऱ्यांनी विविध पिकांचा पिक विमा काढलेला होता. व संमती पत्र न जोडल्याने 18 हजार 540 शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र चींता जनक वातावरण बघायला मिळत आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख सोलार पंपाचा लाभ, शासनाचा मोठा निर्णय