शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वार्षिक 12 हजार मिळवण्यासाठी लगेच हे काम करा | Pm Kisan 

शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी असून शेतकऱ्यांना वार्षिक 12000 मिळवण्यासाठी लगेच नोंदणी करावी लागणार आहे व त्यानंतर शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे, केंद्र शासना अंतर्गत पीएम किसान योजना संपूर्ण देशामध्ये राबवली जाते तसेच नमो शेतकरी योजना महाराष्ट्र राज्यांमध्ये पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राबविण्यात आलेली आहे.

 

पी एम किसान योजने अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांची रक्कम देण्यात येते व सध्याच्या स्थितीत महत्त्वाची बातमी म्हणजेच पीएम किसन योजनेची नवीन नोंदणी चालू झालेली आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत पात्र ठरत असलेल्या शेतकऱ्यांनी लगेच नोंदणी करून वार्षिक बारा हजार रुपये मिळवले जाऊ शकतात.

 

पीएम किसान योजनेची नोंदणी प्रोसेस

 

योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम पी एम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

 

त्यानंतर विविध प्रकारचे ऑप्शन्स तुमच्यासमोर ओपन होतील, त्यातील नोंदणी हा ऑप्शन सिलेक्ट करा.

 

त्यानंतर तुमचे राज्य निवडा, त्याबरोबरच तुमचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.

 

तुम्ही टाकलेल्या मोबाईल क्रमांक वर अगदी काही सेकंदामध्ये ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी पुढील बॉक्समध्ये एंटर करा.

 

संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा तसेच आवश्यक मागितली गेलेली संपूर्ण कागदपत्रे आधार कार्ड सह अपलोड करा.

 

अशाप्रकारे वरील दिलेल्या संपूर्ण माहिती वरून तुम्हाला पी एम किसान योजनेची नोंदणी करता येईल.

दुष्काळी मदतीपासून शेतकरी वंचित, 60 हजार शेतकऱ्यांची यादी अपलोड, 4 लाख 50 हजार शेतकरी बाकी