शासन अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात व अशाच प्रकारची एक योजना म्हणजेच पीएम किसान मानधन योजना होय, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 36 हजार रुपयांची रक्कम दिली जाते म्हणजेच महिन्याला तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.
योजने अंतर्गत 18 ते 40 वर्षे या वयोगटातील शेतकरी तसेच मजूर पात्र ठरणार आहे व योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल, 24 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे.
18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना एक प्रकारची महिन्याला रक्कम भरावी लागेल त्यामध्ये 55 रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे तर 40 व्या वर्षी योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा झाल्यास दोनशे रुपये एवढी रक्कम भरावी लागेल. व साठ वर्षानंतर तीन हजार रुपये महिना अशी रक्कम दिली जाईल.
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी डिजिटल सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, तसेच जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार, ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन maandhan.in संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज करता येणार आहे.
गुढीपाडव्यानिमित्त या रेशन कार्डधारकांना मिळणार 9 वस्तू, बघा संपूर्ण माहिती