शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 15 हप्ते वाटप झालेले आहे, आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली असून त्यात अनुषंगाने भारत सरकार लवकरच शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची भेट देणार आहे. म्हणजेच पीएम किसान योजनेचा पुढील सोळावा हप्ता वाटप करणार आहे. योजनेच्या पुढील हप्त्याचे पैसे केव्हा येणार? या संदर्भात एक छोटासा अपडेट आपण जाणून घेणार आहोत.
15 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधरावे हप्त्याची रक्कम जमा केलेली आहे. संपूर्ण देशभरातील आठ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या रकमेचा लाभ मिळवलेला आहे. या योजनेच्या पंधराव्या हप्त्यापोटी केंद्र शासनाने सुमारे 18000 कोटी रुपये इतका निधी खर्च केला आहे.
नवीन वर्षानिमित्त 2 हजार रुपयांची भेट:
केंद्र सरकारच्या अंतर्गत दर वर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत पुरवणारी महत्त्वपूर्ण अशी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आपल्या देशात सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली असून त्यानिमित्त शेतकऱ्यांना लवकरच केंद्र शासन 2000 रुपयाची भेट देणार आहे.
पी एम किसान 16 वा हप्ता कधी येणार?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सोळावा हप्ता वितरित करणे बाकी असून लवकरच केंद्र शासन हा हप्ता करणार आहे. आपल्या देशामध्ये 2024 मध्ये निवडणूक होणार असून मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या आसपास निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल त्यामुळे त्यापूर्वी केंद्र शासन शेतकऱ्यांना 16 वा हप्ता वाटप करणार आहे.
महत्वाची बातमी: महा dbt शेतकरी योजनांची नवीन सोडत यादी जाहीर, यादीत नाव चेक करा
त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येऊ शकतो. हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.