राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 15 हजार रुपये, पीएम किसान योजनेअंतर्गत 9 हजार रूपये देणार | PM Kisan Yojana

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत संपूर्ण देशामध्ये पीएम किसान योजना राबविण्यात येते, व पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासना अंतर्गत नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबविण्यात येते नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेला आहे, अशा दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांची रक्कम मिळते. परंतु यामध्ये मोठा बदल करून आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे.

पी एम किसान योजनेमध्ये मोठा बदल

पीएम किसान योजना अंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी अंतर्गत वितरित करण्यात येते परंतु एक फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय बजेट सादर केला जाणार आहे व त्यामध्ये पी एम किसान योजनेमध्ये मोठा बदल करण्याची तयारी सुरू केलेली आहे. यातील मुख्य बाब म्हणजे येणारा काळ हा निवडणुकीचा असणार आहे त्यामुळे वितरित करण्यात येणाऱ्या रकमेमध्ये थोडा बदल केला असता शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. तसेच राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र आहे आतापर्यंत अनेक शेतकरी योजनेअंतर्गत पात्र ठरलेले आहे.

 

पीएम किसान योजनेअंतर्गत 6 हजारा ऐवजी 9 हजार रुपये

पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते परंतु यामध्ये थोडा बदल करून आता वार्षिक 9000 रुपये एवढी रक्कम देण्याबाबतची तयारी चालू झालेली आहे. पी एम किसान योजनेची निश्चितता बघायची झाल्यास एक फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय बजेटमध्ये योजनेतील बदल अर्थातच स्पष्ट दिसून येईल.

जर पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली गेली तर केंद्र सरकारचे 9 हजार व राज्य सरकारचे सहा हजार अशी एकूण वार्षिक पंधरा हजार रुपये एवढी रक्कम राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे अर्थातच तीन हजार रुपये एवढी वाढीव रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्याने अर्थातच एक प्रकारचा चांगला फायदा शेतकऱ्यांचा होईल.

 

तुरीचे भाव वाढण्याची शक्यता त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विकावी की नाही?