शेतकरी मित्रांनो आपण गेल्या अनेक दिवसांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वाटप करण्यात येणाऱ्या पी एम किसान सन्मान निधी रकमेमध्ये वाढ होणार असून आता शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळणार अशा बातम्या ऐकलेल्या आहेत, आणि ऐकत आहोत. त्याचबरोबर यावर्षी एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना वाढीव रकमेची घोषणा करण्यात येईल अशा देखील बातम्या आपण ऐकल्या होत्या. परंतु तसे काहीही झालेले नाही.
अजूनही प्रसार माध्यमांमध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 8000 मिळणार अशा बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामधील सत्य काय आहे खरोखर शेतकऱ्यांना वाढीव दराने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चे पैसे मिळणार आहेत का? तसेच शासनाने त्याबाबत दिलेले स्पष्टीकरण या संदर्भातील माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्यांकडून किसान सन्मान योजना रक्कम 8 हजार करण्याची मागणी:–
शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत केंद्र शासन दरवर्षी शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये एका टप्प्यात असे मिळून देते. परंतु आता शेतकरी बांधवांकडून ही रक्कम वाढ करून वार्षिक आठ हजार करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याच मागणीवर केंद्र शासनाने आता स्पष्टीकरण दिले आहे.
शेतकऱ्यांना पीएम किसान चे 8000 मिळणार का?
दरम्यान केंद्र शासनाने शेतकऱ्यांकडून मागणी होत असलेल्या रकमेच्या वाढी संदर्भातील बातमीवर आता स्पष्टीकरण दिलेले आहे केंद्र शासनाने असा कोणताही प्रस्ताव नसून सध्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यात येत असून पुढील काही कालावधीसाठी सहा हजार रुपये इतकीच रक्कम देण्यात येईल असे म्हटले आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच केंद्र शासनाचा विचार करू शकते परंतु सध्या यामध्ये वाढ होणार नाही.
PM किसानचा 16 वा हप्ता कधी मिळणार?
शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता नेमकं कधी येणार. मित्रांनो आता पुढच्या महिन्यांमध्ये आचारसंहिता लागणार असून संपूर्ण देशभरात लोकसभेचे इलेक्शन होणार आहे त्यामुळे अनेक शेतकरी त्या इलेक्शन च्या आचार संहिता पूर्वी आपल्याला पैसे मिळतील अशी वाट पाहत आहे.
आतापर्यंत शेतकरी बांधवांना 15 हप्ते वाटप करण्यात आलेले असून सोळावा हप्ता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाटप करण्याची दाट शक्यता आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या पोस्टमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना च्या देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये वाढी संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सोळावा हप्ता कधी मिळणार या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट जाणून घेतलेली आहे. ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असून इतरांना देखील नक्की शेअर करा.