पोस्ट ऑफिस च्या या योजनेतून मिळणार दर महिन्याला 9250 रूपये, बघा संपुर्ण माहिती | Post Office Yojana

पोस्ट ऑफिस अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, त्यातीलच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 9250 रुपये मिळवले जाऊ शकते पती व पत्नी यांनी गुंतवणूक केली असता मिळणाऱ्या व्याजामधूनच त्यांचा प्रत्येक महिना 9200 एवढा मिळू शकतो.

 

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत 15 लाखापर्यंतची गुंतवणूक पाच वर्षासाठी जोडीदाराला करावी लागणार आहे, त्यामध्ये एकल संयुक्त अशी गुंतवणूक करता येणार असून एकाला गुंतवणूक करणाऱ्याला, तसेच संयुक्त गुंतवणूक करणाऱ्याला दर महिन्याला व्याजाची रक्कम देण्यात येईल.

 

ही योजना सेवानिवृत्त नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण सेवानिवृत्त झाल्यानंतर पैशाची गुंतवणूक केली असता त्यांना दर महिन्याला पैसे सुद्धा मिळणार आहे. पाच वर्षापर्यंत गुंतवणूक करता येणार आहे त्यानंतर गुंतवणूक करायचे असल्यास नवीन खाते उघडून त्यामध्ये गुंतवणूक करावी लागेल.

 

पाच वर्षा आधी म्हणजे एक ते तीन वर्षा दरम्यान तुम्ही रक्कम काढली असता दोन टक्के कपात करण्यात येईल, तसेच पाच वर्षांपूर्वी रक्कम काढायची झाल्यास एक टक्के वजा केल्यानंतर रक्कम देण्यात येईल.

मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत मिळणार प्रत्येक गावाला 20 विहिरी, बघा संपूर्ण माहिती