पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सौर ऊर्जेत अग्रेसर बनवण्यासाठी तसेच प्रत्येकाला सौर ऊर्जेच्या माध्यमातून जोडण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. अयोध्या मध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर दिल्लीला परतताना त्यांनी ही एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. देशातील जवळपास एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा बसवण्याची लक्ष पंतप्रधान मोदी यांनी ठेवले आहे.
या योजनेला प्रधानमंत्री सूर्योदय योजना असे नाव देण्यात येत असून चक्क पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा केलेली आहे. Pradhan Mantri Suryoday Yojana संदर्भात मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल वर या संदर्भात माहिती दिली आहे. अयोध्या मध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्यांचा संकल्प अधिक दृढ झालेला आहे. असे देखील मोदी यांनी म्हटले आहे.
देशातील गरीब व मध्यमवर्ग यांची वीज बिल कमी असावे तसेच प्रत्येकापर्यंत विज बिल पोहोचावी याकरिता प्रत्येकाच्या घरावर स्वतःची सोलर यंत्रणा असावी, यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आपला देश ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वावलंबी होणार आहे.
Pradhan Mantri Suryoday Yojana घरगुती ग्राहकांना छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम सध्या स्पष्ट झालेली नाही, परंतु ही रक्कम घराच्या आकारावर अवलंबून असणार आहे. आपल्या देशामध्ये ऊर्जा क्षेत्रामध्ये ही योजना क्रांती घडवून आणणार आहे. तसेच सौर ऊर्जेवर आधारित वीज प्रत्येकाला पुरवल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे फायदे:
देशाच्या पंतप्रधानामार्फत घोषणा करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे काही फायदे खालील प्रमाणे आहेत.
1. गरीब आणि मध्यमवर्ग यांची वीज बिल कमी होणार आहे.
2. सौर उर्जेवर आधारित वीज असल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे.
3. ऊर्जा क्षेत्रामध्ये आपला देश स्वावलंबी होणार आहे
Pm Suryoday Yojana कधी चालू होणार योजना?
प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही केंद्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना असणार आहे. ही योजना संपूर्ण देशभरात 2024 25 पासून चालू करण्याचा निर्धार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जवळपास केंद्र शासनाने दहा हजार कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला आहे.
अशाप्रकारे ही एक नवीन व महत्त्वाची असणारी योजना केंद्र शासनाच्या मार्फत संपूर्ण देशभरात लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर योजनेच्या अटी व शर्ती तसेच अर्ज प्रक्रिया या संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेऊया.