या रेशन कार्डधारकांना मिळणार रेशन ऐवजी 9 हजार रुपये, बघा तुम्हाला मिळणार का? | Resion Card

रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी कारण केसरी रेशन कार्डधारकांना आता वार्षिक 9000 मिळू शकणार आहे, काही महिन्यांपासून केसरी रेशन कार्ड धारकांचे धान्य वाटप बंद करण्यात आलेली आहे व त्यानंतर दीडशे रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे दर महिन्याला पैशाचे वितरण केले जाणार अशी माहिती सुद्धा दिली गेलेली होती.

 

राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते बघूया, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यांना प्रति लाभार्थी दीडशे रुपये दिले जाईल.

 

9 हजार कुणाला मिळणार?

 

एखादे उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या कुटुंबामध्ये जर पाच व्यक्ती असेल पाच व्यक्तीचे कुटुंब असेल तर एका महिन्याला एका व्यक्तीला दीडशे रुपये मिळेल म्हणजेच एकूण साडेसातशे रुपये मिळणार आहे, त्याचा 1 वर्षभराचा हिशोब करायचा झाल्यास 9 हजार रुपये वर्षाला रेशन कार्डधारकांना मिळणार.

अग्रीम पीक विम्याचा दुसरा टप्पा 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, तुम्हाला मिळणार का पिक विमा?