व्यवसाय चालू करण्यासाठी मिळेल 25 लाखापर्यंतचे कर्ज , आत्ताच आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करा | Rojgar Nirmiti

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या आहे व अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक प्रकारची नोकरीची संधी उपलब्ध व्हावी त्यांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करता यावा, यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर लाभार्थ्याला कर्जाची उपलब्धता करून दिली जाते.

 

25 लाखापर्यंत ची कर्ज तसेच पस्तीस टक्के आर्थिक सहाय्य देण्यात येईल. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अथवा ऑनलाईन या दोन पैकी कोणत्याही एका पद्धतीने नागरिकाला अर्ज करावा लागेल त्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असणे गरजेचे आहे.

 

अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे

 

जन्म दाखला.

जातीचा दाखला

आधार कार्ड

पासपोर्ट साईज फोटो

रहिवाशी दाखला

प्रकल्प अहवाल

पॅन कार्ड

 

अर्ज प्रक्रिया

 

कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी https://maha-cmegp.gov.in/homepag हे संकेतस्थळ ओपन करून त्या ठिकाणी विचारले गेलेले संपूर्ण माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, व अर्ज सबमिट करा.

पंतप्रधान सूर्यघर योजने अंतर्गत 300 युनिट पर्यंतची वीज मिळणार मोफत