सातबारावर वारसाची नोंद तसेच बोजा दाखल करणे आता ऑनलाईन, महत्वाची बातमी | Satbara Varas Nond Online

शेतकरी मित्रांनो आता तलाठी कार्यालयाकडे धावपळ करण्याची वेळ संपलेली आहे. आता आपल्याला शेती संदर्भातील अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन दिवसेंदिवस शेतकऱ्यांना डिजिटल करण्यासाठी शेती संदर्भातील अनेक बाबी ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे. आता शेतकरी बांधवांना सातबारावर वारसाची नोंद करणे तसेच बोजा दाखल करणे या बाबी ऑनलाईन करता येणार आहे.

 

या सर्व सुविधा आहेत ऑनलाईन:

शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे याची माहिती नसते त्यामुळे आपल्याला तलाठी कार्यालयाकडे वारंवार चकरा मारावे लागतात. परंतु आता खालील बाबी आपण ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या करू शकतात.

1. सातबारा उतारा वर वारसाची नोंद करणे

2. मयताचे नाव कमी करणे

3. बोजा दाखल करणे किंवा बोजा कमी करणे

4. फेरफार संदर्भातील इतर सुविधा

5. अपाक शेरा कमी करणे

6. विश्वस्तांची नाव बदलणे

 

वरील सर्व बाबी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध असल्यामुळे तलाठी कार्यालयाकडे वारंवार जाण्याची आवश्यकता नाही.

 

वेळेची व पैशाची बचत:

शेतकरी बंधूंना प्रत्येक छोट्या छोट्या कामाकरिता तलाठी कार्यालयांमध्ये जावे लागले तर पैशाची उधळण तसेच वेळ वाया जात असे. त्यामुळे आता या सर्व सुविधा तुम्ही घरबसल्या करू शकतात. त्यामुळे आता पैशाची आणि वेळेची बचत होणार आहे.

 

शासनाच्या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत करण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आता सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने करावे असे देखील आवाहन शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात येत आहे.