अनेकदा शेळी पालन करायचे असते परंतु शेळ्या विकत घेण्यासाठी पैशाची उपलब्धता नसल्याने शेळी पालन करण्याचा विचार ना इलाजाने सोडावा लागतो महिलांना जर शेळी पालन करायचे असेल तर एक मोठी संधी चालून आलेली आहे कारण अहिल्या शेळी योजना अंतर्गत, महिलांना 90 टक्के अनुदानावर शेळ्या दिल्या जाणार आहे.
अहिल्या शेळी योजना अंतर्गत दहा शेळ्या व एक बोकड याप्रमाणे 90 टक्के अनुदानावर शेळ्या दिल्या जातात जर महिलांना योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे देण्यात आलेली आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
अहिल्या शेळी योजनेअंतर्गत फक्त महिलांना लाभ दिला जाणार आहे, त्यामुळे पुरुष योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे इच्छुक असणाऱ्या महिलांनी खालील प्रकारे दिलेल्या प्रोसेस नुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. 18 ते 60 वर्षा दरम्यान महिलेचे वय असावे.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- अपत्य प्रमाणपत्र
- कास्ट सर्टिफिकेट
- स्वयंघोषणापत्र
ऑनलाइन अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस
सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी प्ले स्टोर वरून अहिल्या योजना हे ॲप डाऊनलोड करावे,विचारले गेलेली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरावी लागेल त्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे, प्राथमिक निवड व अंतिम निवड करण्यात येईल. त्यानंतर एक अर्ज ओपन होईल अर्ज ओपन झाल्यावर संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून अर्ज सबमिट करावा अशा प्रकारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज अहिल्या योजना अर्ज करता येईल.
या राज्यात शेतकऱ्यांना मिळणार एकरी 10 हजार रुपयांची नुकसान भरपाई, तुम्ही आहात का पात्र?