देशामध्ये विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, त्यामध्ये शेतकरी, तरुण, वृद्ध यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात योजना आहे व त्यातीलच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना होय. शेतकरी तरुण महिला तसेच वृद्ध या योजने मध्ये लाभ घेऊ शकतात. त्यामुळे दर महिन्याला पाच हजार रुपये एवढी पेन्शन चालु केली जाऊ शकते.
अटल पेन्शन योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वर्षे या दरम्यान वय असावे. तसेच अर्जदार व्यक्तीचे बँक खाते असावे तसेच मोबाईल क्रमांक सुद्धा असणे आवश्यक आहे. अटल पेन्शन योजना अंतर्गत लाभार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारचे फायदे दिले जाणार आहे.
पेन्शन मिळवण्यासाठी एवढ्या रुपयांची गुंतवणूक
तुमचे वय काय यानुसार तुम्हाला दर महिन्याला गुंतवणूक करावी लागेल व तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवरून साठ वर्षानंतर तुम्हाला त्यानुसार पेन्शन चालू केली जाईल, तुमचे वय 18 वर्षाची असेल तर तुम्हाला 42 रुपये गुंतवावे लागणार, त्यामध्ये एक हजार रुपये पेन्शनचा लाभ तुम्हाला दिला जाईल.
तुम्ही जर 84 रुपये गुंतवले तर दोन हजार रुपये एवढे पेन्शन दिली जाणार, 210 रुपये गुंतवले असता, पाच हजार रुपये पेन्शन दिली जाणार, तुम्ही जर चाळीसाव्या वर्षी योजनेसाठी अर्ज केला असता तुम्हाला पाच हजार रुपये एवढी पेन्शन मिळवण्यासाठी,1454 रुपयांचा लाभ सहज मिळू लागेल. अशाप्रकारे राज्यातील नागरिकांना अटल पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांसाठी व्याज माफी जाहीर, या तारखेपर्यंत होणार व्याज माफ