या योजनेअंतर्गत पती-पत्नीला मिळणार महिन्याला 6 हजार, बघा कसा लाभ घ्यावा? | Shram Yogi Manadhan Yojana 

विविध प्रकारच्या योजना सर्वसामान्यांसाठी राबवल्या जातात त्यातीलच एक योजना म्हणजेच श्रमयोगी मानधन योजना होय, या योजनेअंतर्गत महिन्याला पती-पत्नीला सहा हजार रुपये एवढी रक्कम मिळू शकते योजनेचा लाभ कसा घ्यावा तसेच कोणते नागरिक योजनेसाठी पात्र ठरणार आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे बघण्याचा प्रयत्न करूयात.

 

पीएम श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला सर्वप्रथम गुंतवणूक करावी लागते व गुंतवणूक साठ वर्षापर्यंत करावी लागणार व त्यानंतर महिन्याला एक प्रकारची पेमेंट पती-पत्नीला सहा हजार रुपये एवढी दिली जाईल, परंतु एकाच व्यक्तीला लाभ घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला महिन्याला तीन हजार रुपये महिना मिळू शकतो.

 

लाभ घेण्यासाठी काय करावे?

 

योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांना लाभ घेता येणार आहे, गुंतवणूक करायची झाल्यास 55 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत करावी लागणार. लाभ घेण्यासाठी कोणत्याही एका बँकेमध्ये जाऊन श्रमयोगी मानधन योजनेसाठी आपले बँक अकाउंट उघडावे त्यानंतर त्या बँक खात्यामध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे व तुमची गुंतवणूक 60 वर्षापर्यंत करावी लागेल त्यानंतर तुम्हाला महिन्याला रक्कम मिळेल.

पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 36 हजार रुपये, या ठिकाणी अर्ज करा