शेतकऱ्यांना दिवसा विजेची उपलब्धता व्हावी याकरिता अनेक शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहे, अशा वेळेस शेतीमध्ये विज उपलब्ध असणे गरजेचे आहे सिंचन सुविधाचा वापर करताना वीज अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेले आहे व शेतकरी वीज जोडणी च्या प्रतीक्षेमध्ये आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणी साठीचे कोटेशन भरलेले असेल अशा शेतकऱ्यांना सोलार पंप देण्यात येणार आहे.
अनेक वेळा विजेमध्ये बाधा येते, अशावेळी शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता सौर कृषी पंप योजना राबवण्यात येते. विज जोडणीच्या प्रतीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे त्यामुळे योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंप द्वारे वीज जोडणी दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांची वीज जोडणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना विचारून सौर कृषी पंपासाठी इच्छुक आहात का, असल्यास नोंदणी नवीन सोलर पंप साठी केली जात आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी महावितरण कडे कोटेशन भरलेले आहे अशा शेतकऱ्यांना नोंदणीसाठी सांगण्यात येत आहे. महावितरण च्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करता येते.
अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे लवकरच शेतकऱ्यांना वीज सुविधा उपलब्ध होईल त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी वेबसाईट ओपन करू नोंदणी करून घ्यावी.