आजचे सोयाबीन चे बाजारभाव पहा, बाजारभाव वाढ! | Soyabean Bajarbhav

राज्यामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केलेली आहे याचे कारण म्हणजे हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला योग्य दर मिळत नाहीये व त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ होणाच्या अपेक्षने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केलेली आहे व अशातच सध्याच्या स्थितीमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

 

सोयाबीनची बाजार समितीमध्ये आवक सुद्धा कमी प्रमाणात होत होती परंतु आजच्या सोयाबीन दराचा विचार करायचा झाल्यास सोयाबीनच्या दरात वाढ झालेली दिसते तसेच राज्यातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेला दर काय आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

जालना बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळालेला दर 4350 रुपये एवढा बघायला मिळाला, हिंगोली बाजार समितीमध्ये 4275 रुपये एवढा दर होता, गोंदिया बाजार समितीमध्ये 4275 रुपये एवढा दर बघायला मिळाला. बीड या ठिकाणी सोयाबीनला मिळालेला दर 4851 रुपये एवढा मिळाला.

 

राज्यातील कोल्हापूर बाजार समितीमध्ये 4600 एवढा दर होता, अमरावती बाजार समितीमध्ये 4349 रुपये एवढा, तर यवतमाळ येथे 4245 एवढा दर मिळाला. अशाप्रकारे विविध बाजार समितीत वरील प्रमाणे दर बघता येईल.

महिलांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना, महिलांना मिळणार 90% टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर चा लाभ