शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतामध्ये होते काढण्याकरिता आले नव्हते त्यावेळेस सोयाबीनला चांगला दर मिळत होता. यावर्षी जसजशी सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्रीकरिता बाजारामध्ये आणण्यास सुरुवात केली तसतसा सोयाबीन चा दर घसरत गेला. परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असून ते शेतकरी सोयाबीनचे दर वाढण्याची वाट पाहत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी प्राप्त झालेली असून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दबावत असलेले सोयाबीनचे दर हळूहळू वाढायला सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाची वातावरण पसरत आहे. महाराष्ट्र राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगला दर मिळालेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात सोयाबीन हे पीक पिकवले जाणारे महत्त्वाचे पीक आहे प्रामुख्याने अनेक शेतकरी सोयाबीन नगदी पीक असल्यामुळे पिकवत असतात.
खरीप हंगामातील एक महत्त्वाचे पीक असल्यामुळे या पिकाला चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते परंतु यावर्षी सोयाबीनच्या दराने शेतकऱ्यांना चक्क रडवले आहे. मागील दोन वर्षे सोयाबीनला अतिशय चांगला दर मिळालेला होता शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल इतका विक्रमी दर मिळवला होता त्यामुळे या वर्षी सुद्धा असाच दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती.
सन 2023 24 करिता सोयाबीनला 4,600 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव केंद्र शासनाने ठरवून देण्यात आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दर फक्त तीनशे रुपयांनी जास्त आहे. राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमती एवढे सुद्धा दर मिळत नाही. सोयाबीनचे दर कमी असल्यामुळे अनेक कारणे आहेत त्यामध्ये शासनाची धोरण येत असेल उत्पादन त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाजार भावाला प्रभावित करत असतात.
बाजार समितीत सोयाबीनला चांगला दर:
सोयाबीन बाजारभाव संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्र राज्यातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 13 फेब्रुवारी 2023 रोजी कमीत कमी 3500 रुपये सरासरी दर 4200 रुपये त्याचबरोबर जास्तीत जास्त दर हा 6 हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे. त्यामुळे असाच जर इथून पुढे मिळेल अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
शेतकरी बांधवांनो हे बाजारभाव फक्त एकच बाजार समिती मध्ये वाढले होते, त्यामुळे सर्व बाजार समितीमध्ये हा भाव तुम्हाला पाहायला मिळणार नाही.
टीप: शेतकरी बांधवांनी कोणताही शेतमाल किंवा धान्य विकायला नेण्यापूर्वी जवळच्या बाजार समिती मधील बाजार भावाची खात्री करून घ्यावी, बाजार समिती नुसार दर वेगवेगळे असतात.
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी चे 2 हजार, तात्काळ हे काम करा