सोयाबीन दराची स्थिती काय? विविध बाजार समितीतील सोयाबिन दर | Soyabin Bajar Bhav

देशामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबिन लागवड केल्या जाते, दर वर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन ची लागवड महाराष्ट्र राlज्यांमध्ये सुद्धा केली गेलेली होती, परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मोठा फटका शेती पिकांना बसलेला होता तसेच येलो मोझ्याक मुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. परंतु अशा स्थितीमध्ये शेतकरी मात्र सोयाबिन ला चांगला दर मिळणार या अपेक्षेवर होते. परंतु यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळत नाहीये.

 

विविध बाजार समितीचा विचार करायचा झाल्यास 4300 ते 4400 रुपये या दरम्यान सोयाबीनचे दर चालू आहे, विविध ठिकाणी हमीभावापेक्षा सोयाबीनला दर कमी मिळत असल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे, विविध बाजार समितीमध्ये सोयाबीन ला काय दर मिळत आहे हे बघूयात.

 

उमरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेला दर 4650 रुपये एवढा होता तर सर्वसाधारण दर 4620 रुपये मिळाला. तसेच बाजार समितीमध्ये 70 क्विंटल एवढी आवक झाली. करंजा बाजार समितीमध्ये सोयाबीन ला मिळालेला दर 4410 रूपये एवढा होता. तर सरासरी दर 4380 रुपये एवढा होता. बाजार समितीतील आवक 4000 क्विंटल एवढी होती.

 

गेवराई बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेला दर 4381 रुपये एवढा होता, सर्वसाधारण दर 4350 रुपये एवढा होता, बाजार समितीतील आवक 45 क्विंटल एवढी होती. अशा प्रकारे विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सोयाबीनचे दर यामध्ये फरक जाणवतो.

राज्यातील बांधकाम कामगारांना मिळेल 5000 रूपये, सोबत भांडी सुद्धा, अशा प्रकारे अर्ज करा