सोयाबीन दरात एवढ्या रुपयांची घसरण, बाजार समितीत काय मिळतोय सोयाबीनला दर ? | Soyabin Bhav

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते परंतु यावर्षीचा विचार करायचा झाल्यास सुरुवातीपासूनच सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी किंवा हमीभाव इतका दर विविध बाजार समितीमध्ये मिळत आहे. परंतु सोयाबिनला मिळत असलेल्या दरामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मात्र चिंतीत झालेला आहे कारण सोयाबीन वर केलेला खर्च सोयाबीनच्या दराने निघत नाहीये.

 

राज्यातील विविध बाजार समितीमध्ये काही ठिकाणी हमीभावा पेक्षा कमी दर मिळत आहे, व चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा बाजार समितीमध्ये सोयाबीन ला तीन हजार रुपये एवढा नीचंकी दर मिळालेला आहे, त्यामुळे हमीभावापेक्षा सोळाशे रुपये एवढा कमी दर सोयाबीनला मिळालेला होता. अशा प्रकारच्या स्थितीचा विचार करायचा झाल्यास शेतकऱ्यांना सोयाबीन पीक काढणे हे कठीण होऊन बसणार आहे.

 

बाजार समितीतील सोयाबीन दर

 

राज्यातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनला विविध प्रकारचा दर मिळताना दिसतो त्यातीलच अमरावती बाजार समितीत सोयाबीनला मिळालेला दर 4399 रुपये एवढा मिळाला तर सरासरी दर 4274 रुपये एवढा मिळाला. तसेच राज्यातील नागपूर बाजार समितीत मिळालेला दर 4450 रुपये एवढा होता. सरासरी दर 4463 रुपये एवढा मिळालेला आहे.

 

मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेला दर 4425 रुपये एवढा मिळाला. तर सरासरी दर 4200 रुपये एवढा होता. अशाप्रकारे राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला वरील प्रमाणे दर मिळत आहे.

या बँकेचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंतचे पीक कर्ज व्याज होणार माफ