शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आजचे सोयाबीन व कापसाचे दर काय? | Soyabin Dar

राज्यामध्ये कापूस सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते परंतु हंगामाच्या सुरुवातीपासून या दोन्ही पिकांना चांगल्या प्रमाणे दर मिळत नाही व त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीनची साठवणूक करून ठेवलेली आहे व जेव्हा चांगला दर मिळेल अशा वेळेस सोयाबीनची विक्री करावी असे शेतकऱ्यांनी ठरवलेले होते. आपण बघूया सोयाबीन व कापसाला काय दर मिळत आहे.

 

देशातील कापूस दराचा विचार करायचा झाल्यास थोड्या प्रमाणात चढ उतार कापूस दरामध्ये होताना दिसते परंतु त्यामुळे शेतकरी चिंतीत झालेले आहे, कारण कापसाचे दर कमी होणार का ही भीती शेतकऱ्यांना भासत आहे, कापसाला मिळालेला आजचा दर 7 हजार 300 ते 7 हजार 700 रुपये एवढा होता.

 

कापसाच्या दराप्रमाणेच सोयाबीनच्या दरामध्ये सुद्धा चढ-उतार होताना दिसते परंतु बाजार समितीमध्ये आतापर्यंत सुद्धा सोयाबीनचे दर वाढ झालेली नाही सुरुवातीपासूनच सोयाबीने नीचांक पातळी गाठलेली आहे व त्यावर सोयाबीन दर जात नाही आहे व त्यामुळे सोयाबीन साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना मात्र सोयाबीनचे दर वाढणारच नाही का? हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.सोयाबीनला मिळत असलेला दर 4300 ते 4500 दरम्यान मिळतोय, अशाप्रकारे वरील प्रमाणे देण्यात आलेले आहे.

वैयक्तिक शौचालयासाठी 12 हजार रु मिळवण्यासाठी आत्ताच अशा पद्धतीने अर्ज करा, बघा आवश्यक कागदपत्रे