सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी करावी सोयाबीन वर पेरणीपूर्वी अशी बीज प्रक्रिया, उत्पादन खर्च कमी होणार | Soyabin Dar 

शेतकरी मोठ्या प्रमाणात खरीप हंगामामध्ये सोयाबीनची लागवड करतात परंतु सोयाबीन वर येणाऱ्या बुरशी सह इतर किडीच्या रोगामुळे शेतकऱ्यांना फवारण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो व त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतो व त्यामुळे जर तुम्हाला उत्पादन खर्च खूप कमी करायचा असेल तर सोयाबीनची पेरणी किंवा लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीनवर बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे, ही बीजप्रक्रिया केल्याने शेतकऱ्यांना अत्यंत कमी उत्पादन खर्च करावा लागेल. 

 

सोयाबीन बीज प्रक्रिया केली असता उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडते, तसेच सोयाबीन पिकाला देण्यात येणाऱ्या खताची सुद्धा बचत होते. पीक जोमाने वाढण्यास मदत होऊन, तसेच जमिनी द्वारे व बियाणे द्वारा येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी समाप्त होतो व उत्पादनात वाढ होते.

 

बीजप्रक्रिया करत असताना अॅझॉऑक्झिस्ट्रेबीन २.५% + थायोफिनेट मिथाईल ११.२५% + थायोमिथोक्झाम २५ % एफएस हे सर्व घटक एकत्र मिश्रित करून बियाण्याला लावले असता अगदी काही घंट्यांमध्ये किंवा लवकरात लवकर पेरणी किंवा सोयाबीनची लागवड केल्याने रोगांचा होणारा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात टाळला जाऊ शकतो व उत्पादन खर्चामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत शेतकऱ्यांची होऊ शकते. अशाप्रकारे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे समजून सोयाबीनवर पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.

 

या वर्षी कोणते सोयाबीन पेरावे, या सोयाबीनची करा लागवड, जमिनी नुसार निवडा बियाणे