राज्यातील कापूस, सोयाबीन, कांदा तसेच हळद चे आजचे बाजारभाव, सविस्तर दर पहा | Soyabin Dar

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा, कापूस, सोयाबीन, तसेच हळद अशा प्रकारच्या विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते परंतु या पिकांना सध्याच्या स्थितीमध्ये चांगला दर मिळत आहे की नाही, तसेच अभ्यासाकांच्या मते कापूस सोयाबीन दरात स्थिती जाणुन घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

कापूस दराची स्थिती

 

सध्याच्या स्थितीत कापूस दराचा विचार करायचा झाल्यास कापसाचे दर स्थिरावलेले आहे याचे मुख्य कारण म्हणजे मार्च ऐंडींगला असताना कापसाच्या दर स्थिरावलेले दिसते परंतु कापसाच्या दरामध्ये शंभर ते दोनशे रुपये एवढी घसरण झालेली आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झालेले आहे परंतु कापूस अभ्यासाच्या मते कापसाचे दर स्थिर राहतील अशा प्रकारचा अंदाज सुद्धा व्यक्त केलेला आहे.

 

सोयाबीन दराची स्थिती

 

हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनचे दर खालावलेले आहे सोयाबीनच्या दरामध्ये उच्चांक पातळी गाठलेली दिसत नाही सोयाबीनचे दर स्थिरावलेले असून 4200 ते 4400 रुपये दर सोयाबीनला मिळताना दिसतो. परंतु सोयाबीनची आवक कायम आहे व ही आवक पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे.

 

हळद दराची स्थिती

 

सध्याच्या स्थितीमध्ये हळद उत्पादक शेतकरी हळदीची काढणी करताना दिसतात तसेच 70 टक्के हळद ही काढणी झालेली आहे तर उर्वरित हळद पंधरा ते वीस दिवसांमध्ये काढणी केली जाईल तसेच हळदीला 13000 पर्यंतचा दर मिळतो आहे तर काही बाजार समितीमध्ये याही पेक्षा चांगला दर हळदीला मिळताना दिसतो त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमधील आनंदाचे वातावरण बघायला मिळतील. तसेच हळद दराची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

 

कांदा दराची स्थिती काय?

 

सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातलेली आहे व ही बंदी काढलेली नसून याचा परिणाम कांद्याच्या दरावर पडताना दिसतो कांद्याच्या दरात अजूनही दबाव बघायला मिळत आहेत परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होताना दिसते, 1100 ते 1400 रुपये एवढा सरासरी तर कांद्याला मिळत आहे. बाजारातील असलेली आवक व कांद्याचे दर अशाच पातळीवर राहण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे.

तुम्हाला पिक विमा मिळाला नसेल तर पिक विमा न मिळण्याची कारणे तसेच पिक विमा मिळणार का? बघा संपूर्ण माहिती