रोजच्या जीवनामध्ये खाद्यपदार्थ बनवण्यासाठी विविध प्रकारच्या तेलांचा समावेश केला जातो व सोयाबीनच्या तेलाचे दर वाढलेले आहे व त्यामुळे सर्वसामान्यांना एक प्रकारचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे, कारण रोजच्या जीवनामध्ये खाद्य तेलाचा वापर केला जातो व सोयाबीन तेलाचे दर वाढल्याने आता सर्वसामान्यांना तेलासाठी जास्त पैसे मोजावे लागेल.
नागरिकांना पूर्वी तेलासाठी किती रुपये मोजावे लागत होते तसेच सध्याच्या स्थितीमध्ये सोयाबीन तेलासाठी किती रुपये मोजावे लागत आहे तसेच पुढे तेलाचे दर अजूनही वाढण्याची शक्यता आहे का या संपूर्ण विषयावर आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर एक सर्वसामान्य नागरिक किंवा भारतातील नागरी असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे कारण तुम्हाला सोयाबीनचे दर वाढल्याने जास्त पैसे मोजावे लागतील.
पंधरा दिवसांपूर्वीच्या तेलाचा दराचा घाऊक बाजारातील विचार करायचा झाल्यास, 98 रुपये एवढा दर होता. व आता पाच रुपयांची वाढ तेलाच्या दरात झालेली आहे व त्यामुळे आता सोयाबीन तेलाला मिळत असलेला बाजारातील दर 103 रुपयांवर पोहोचलेला आहे. जाणकारांच्या मते अजूनही सोयाबीन तेलाच्या दरात वाढ होऊ शकते.