सोयाबीनला मिळत असलेला दर काय? बघा संपूर्ण माहिती | Soybean Market Price

राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक करून ठेवलेली आहे यामध्ये मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना सोयाबीन ला दर मिळावा हीच सर्वांची एक मागणी आहे कारण दरवर्षी शेतकऱ्यांची सोयाबीन शेतीतून निघाले की सोयाबीनची दर खूप कमी होते त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विकत घेताना मात्र दुपटीच्या किमतीमध्ये बियाण्याची खरेदी करावी लागते, परंतु शेतातून माल घरी आल्यानंतर बाजारामध्ये चार ते पाच हजाराच्या दरम्यान सोयाबीनला भाव मिळतो.

आतापर्यंत आणि शेतकऱ्यांनी जरी सोयाबीनची विक्री केलेली असली तरी सुद्धा काही प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केलेली आहे कशासाठी पैसे नसल्याने अनेक शेतकरी बाजारात सोयाबीन विक्री करीत आहे, सोयाबीनची आवक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. बाजार समिती जास्तीत जास्त दर काय मिळाला यासंबंधी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.

 

विविध बाजार समितीतील सोयाबीनचे दर

काही बाजार समितीत हमीभाव पेक्षा सुद्धा कमी दर आहे त्यामुळे शेतकरी पैशाची आवश्यकतेमुळे नाइलाजाने सोयाबीनची विक्री करत आहेत. लातूर बाजार समितीमध्ये 16 तारखेला मिळालेला दर सरासरी 4 हजार 750 रुपये एवढा होता.10 हजार 371 क्विंटल एवढी पिवळ्या सोयाबीनची आवक झाली काही बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला तर काही बाजार समितीत हमीभाव पेक्षा कमी दर सोयाबीनला मिळाला.

अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त 4600 रुपये एवढा प्रतिक्विंटल दर मिळाला. अमरावती येथे सुद्धा 4600 रुपये एवढा दर मिळाला. यवतमाळ येथे 4650 एवढा सर्वाधिक दर मिळाला. तसेच वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेला प्रती क्विंटल प्रमाणेचा दर जास्तीत जास्त 4655 रुपये, तर सर्व साधारण 4 हजार 560 रुपये एवढा मिळाला.

मिनी ट्रॅक्टर अनुदान मिळविण्यासाठी, या तारखेपर्यंत अर्ज करा, यांना मिळेल 3.50 लाखापर्यंतचे अनुदान