यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे दर हमी भावापेक्षा कमी होते व यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केलेली होती व अगदी काही शेतकऱ्यांकडे आतापर्यंत कापसाची साठवणूक करून ठेवलेली आहे, व अशाच शेतकऱ्यांना आता कापूस दरवाढीचा फायदा होणार आहे, कापसाचे दर आठ हजारांच्या जवळपास येऊन पोहोचलेले आहे. देशातील बाजार समिती 7700 रुपये दर कापसाला मिळत आहे. तसेच कापसाचे दर अजूनही काही दिवसानंतर वाढण्याची शक्यता अभ्यासकांच्या मते वर्तवण्यात आलेली आहे.
तुर उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चांगल्या प्रमाणात दर मिळत आहे तुरीला दहा हजार रुपये पर्यंतचा दर मिळत असल्याने तूर उत्पादन शेतकऱ्यांमधे आनंदाचे वातावरण दिसते. विविध बाजार समितीमध्ये 9500 ते 10500 रुपये एवढा दर तुरीला मिळत आहे. तुरीला सुद्धा चांगला दर राहण्याची शक्यता आहे.
सोयाबीन दराचा विचार केला असता सोयाबीनचे दर गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर दिसतात, तसेच बाजारातील आवक सुद्धा चांगल्या प्रमाणात आहे, सध्याच्या स्थितीमध्ये विविध बाजार समितीत सोयाबीनला 4300 ते 4600 रुपये एवढा दर मिळत आहे.
हळद दराचा विचार करायचा झाल्यास चांगल्या प्रकारे हळदीला यावर्षी दर मिळत आहे कारण, यावर्षी हळदीची लागवड कमी प्रमाणात केलेली होती व त्यातच हळद पिकावर आलेले संकट यामुळे हळदीचे उत्पादन कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे व त्यामुळे जास्तीत जास्त 17000 रुपये एवढा दर बाजार समितीमध्ये हळदीला मिळालेला होता.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के पिक विमा वाटप सुरू, यादीत नाव पहा