तुरीचे दर 12 हजार पार, विविध बाजार समितीला आजचे तूरीचे दर | Tur Bajar Bhav

यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच तुरीला चांगला दर मिळत आहे परंतु मागील काही दिवसांमध्ये तुरीचे दर थोड्या प्रमाणात घसरलेले होते परंतु पुन्हा एकदा तुरीच्या दराने 12 हजारांची पातळी काढलेली आहे व त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 10 हजार 500 या दराने मागील काही दिवसांपूर्वी तुरीची खरेदी केली जात होती परंतु तुरीच्या दराने एकदमच उडी मारलेली दीसते व तुरीचे दर 12 हजार पार गेलेले आहेत.

 

आजचे विविध बाजार समितीतील तुर दर

 

वर्धा जिल्ह्यातील आर्वी बाजार समितीमध्ये तुरीला मिळत असलेला दर, 11340 रुपये एवढा मिळाला. तसेच सरासरी दर 10 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा होता. सिंदी बाजार समितीमध्ये तुरीला मिळालेला दर 11800 रुपये एवढा मिळालेला आहे तर बाजार समितीतील सरासरी दर दहा हजार रुपये एवढा मिळाला.

 

दर्यापूर बाजार समितीमध्ये तुरीला मिळालेला दर 11605 रुपये एवढा होता तर सरासरी दर 11200 एवढा पाहायला मिळाला. उदगीर बाजार समिती तुरीला मिळालेला दर 11800 रुपये होता तर सरासरी दर 11150 रुपये एवढा होता. तुर दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांकडे तूर संपलेली आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केलेली आहे व उन्हाळा असल्याने महिलांकडून तुरीची डाळ करण्यासाठी तुरीला मागणी वाढलेली आहे.

वृद्ध विधवा निराधारांची पगार आली, मिळणार 4500 रुपये, बघा संपूर्ण माहिती