यावर्षी तूर उत्पादक शेतकरी मालामाल होणार आहे कारण इतर मालांना जरी हव्या त्या प्रमाणात दर मिळत नसला तरी सुद्धा तुरीला मात्र चांगल्या प्रमाणात दर मिळत असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, राज्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये पावसाचे वातावरण होते त्या कालावधीमध्ये थोड्या प्रमाणात तुरीचे भाव घसरले परंतु सध्याच्या स्थितीमध्ये अजून तुरीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. राज्यातील विविध बाजार समितीत तुरीला काय दर मिळाला तसेच सर्वाधिक तर कोणत्या बाजार समिती मध्ये मिळाला यासंबंधीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे.
या ठिकाणी तूरिला सर्वाधिक दर
तुरीच्या दराचा विचार केला असता विविध बाजार समिती यांचा विचार करून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समितीमध्ये तुरीला सर्वाधिक दर मिळाला. त्या ठिकाणी तुरीला मिळालेला दर हा सर्वाधिक 12500 ते 12000 रुपये एवढा होता. तसेच अकोला बाजार समितीमध्ये 12000 रुपये एवढा सर्वाधिक दर होता यावरूनच थोडक्यात थोड्या प्रमाणात सुधारणा झाल्याचे कळते.
इतर बाजार समिती मधील तुरीचा दर
तूरीला मिळालेला सर्वाधिक बारा हजार पाचशे एवढा होता व इतर बाजार समितीमध्ये तुरीचा दर हा सर्वसाधारणपणे अकरा हजारांच्या आतच पाहायला मिळतो. हिंगोली बाजार समितीमध्ये तुरीला मिळालेला 10400 ते 9300 रुपये एवढा होता, बाजार समितीतील आवक 800 क्विंटल एवढी होती. सोलापूर येथील दुधनी बाजार समितीमध्ये मिळालेला तुरीचा दर 10490 ते 9000 रुपये एवढा होता. बाजार समितीतील आवक 514 क्विंटल एवढी होती.
नागपूर बाजार समितीत मिळालेला दर 10300 ते 9000 रुपये एवढा होता, तर बाजार समितीतील आवक ही 2991 क्विंटल एवढी झालेली होती. अमरावती बाजार समितीमध्ये 10200 ते 8700 रुपये एवढा होता. तर आवक 783 क्विंटल झाली. अशाप्रकारे तुरीच्या दरामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्याचे तुरीचे दर समाधानकारक आहे.
कांदा अनुदान नवीन जीआर आला, आता या शेतकऱ्यांना मिळणार संपूर्ण कांदा अनुदान, विस्तृत माहिती पहा