शेतकरी बांधवांनो यावर्षी आपल्यासाठी अवकाळी पाऊस हा आता नवीन राहिलेला नाही. शेतकऱ्याचे पीक काढणीस येत असताना त्यावेळेसच पावसाचे आगमन होते, त्यामुळे यावर्षी काय पावसाने शेतकऱ्यांचे मोठे हाल केले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने देशातील काही भागात कडाक्याच्या थंडी बरोबरच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. या लेखात आपण हा हवामान विभागाचा संपूर्ण अंदाज जाणून घेणार आहोत.
संपूर्ण उत्तर भारत तसेच दिल्ली महाराष्ट्र मध्ये कडाक्याची थंडीची लाट सुरू आहे. आठ दिवसापासून संपूर्ण भागात गाराठा निर्माण झालेला असून सर्वत्र थंडी पडत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी धुक्यांची चादर पसरलेली आहे. त्याचबरोबर आता हवामान विभागाने कडाक्याची थंडी सुरू असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.
या भागात अवकाळी पावसाचा अंदाज:
हवामान विभागाने हिमालय लगतच्या भागांमध्ये हलकी बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याचा अंदाज हा 25 ते 28 जानेवारी पर्यंत दिलेला आहे. त्याचबरोबर देशातील काही राज्यांमध्ये जसे की छत्तीसगड त्याचबरोबर आंध्र प्रदेश तसेच ओडिसा व पश्चिम बंगाल आणि सिक्कीम तसेच या ठिकाणी हलका की मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. याच राज्यांच्या काही भागात कडाक्याची थंडी देखील असेल.
देशाच्या उर्वरित भागात किमान अंश तापमान हे दोन अंश सेल्सिअसने वाढणार असल्यामुळे त्या ठिकाणी दिलासादायक बातमी आहे. पुढील काही दिवस देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात दाट धुक्याची चादर पसरण्याची शक्यता आहे.
संपूर्ण हवामानाचा अंदाज घ्यायचा झाल्यास स्कायमेट या कंपनीने दिलेल्या हवामान अंदाजानुसार पश्चिम बंगाल मध्ये आहे का पाऊस तसेच दक्षिण झारखंड त्याचबरोबर ओडिशाच्या काही भागात तसेच विदर्भात 26 जानेवारी पासून थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा हवामान अंदाज?
राज्यात असणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बनच्या प्रभावामुळे तापमानात थोड्याफार प्रमाणात वाढ होणार असून पुढील 48 तासांमध्ये प्रामुख्याने विदर्भामध्ये तसेच मराठवाड्याच्या काही भागात कोकणाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
शेती पिकांना धोका?
आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना खास करून हरभरा उत्पादक शेतकरी तसेच कापूस उत्पादक शेतकरी आणि फळबाग उत्पादक शेतकरी यांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे. शेतकरी बांधवांनी त्यांच्या पिकांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. या अवकाळी पासून बचाव करण्यासाठी योग्य ती पावल उचलायला हवी.