राज्यात तापमानात वाढ होण्यास सुरुवात, तर या भागात पावसाची शक्यता | weather 

 सध्याच्या कालावधीमध्ये राज्यात थंडीचा कडाका जाणवत आहे, येत्या काही दिवसातच राज्यातून थंडी काढता पाय घेऊ शकते, कारण दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत चाललेली आहे उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे थंडी किती दिवस राहणार तसेच वातावरण कसे राहील याबाबतची चिंता शेतकरी तसेच सर्वसामान्यांना भेडसावत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 11 तारखेनंतर राज्यात थंडी काढता पाय घेऊ शकते व त्यानंतर कीमान तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यामध्ये तापमानात वाढ होत असली तरीसुद्धा उत्तर भारतातली स्थिती यापेक्षा वेगळी येते कारण भारताच्या उत्तरेस पावसाची शक्यता आहे.

राज्यातील किमान तापमानाचा विचार केला असता मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये तीन ते चार अंश एवढी वाढ बघायला मिळाली. अर्थात सध्याच्या स्थितीमध्ये आज थंडी असली तरीसुद्धा अकरा तारखे नंतर मात्र राज्यातून थंडी गायब होण्याची शक्यता आहे कारण दिवसेंदिवस तापमानांमध्ये वाढ होत चालली आहे त्यामुळे थंडीचे वातावरण मागे पडत चालेले आहे.

भारताच्या उत्तर भागाचा विचार करायचा झाल्यास त्या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे, राजधानी दिल्लीच्या भागांमध्ये सुद्धा काही वेळा कोण बघायला मिळते तर काही वेळेस पाऊस व बर्फ वृष्टी सुद्धा आहे. तसेच ईशान्येकडील भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशाप्रकारचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

अधिक माहितीसाठी video पहा:

 

तुरीच्या दरात वाढ, तुरीचे दर आणखी वाढतील का? बघा संपूर्ण माहिती